निलजीत उसाच्या शेतात गांजाची लागवड; 3.80 लाखांचा मुद्देमाल जप्त 
कोल्हापूर

Kolhapur News : निलजीत उसाच्या शेतात गांजाची लागवड; 3.80 लाखांचा मुद्देमाल जप्त

एकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज ःगडहिंग्लज तालुक्यातील निलजीत उसाच्या शेतात केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. या कारवाईत 3 लाख 80 हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी मल्लिकार्जुन कलाप्पा वाककी (वय 65) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडहिंग्लजचे पोलिस उपनिरीक्षक रमेश मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अजय सिंदरकर यांनी विशेष पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईत शेतगट क्रमांक 426 मधील ऊस व गहू पिकाच्या दरम्यान ठिकठिकाणी गांजाच्या हिरव्या वनस्पती लावल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान सुमारे 9 किलो 500 ग््रॉम गांजा जप्त केला. गांजाची लागवड करून त्याची विक्री कोणाला करणार होता तसेच या व्यवसायात इतर कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT