नागाव : नागाव ता. हातकणंगले येथील आंबेडकर नगर एमआयडीसी पहिला फाटा हायवेलगत असलेली स्मशानभूमीत नागाव येथील आंबेडकर नगर, संभाजी नगर, व नागाव फाटा, शिरोली यादववाडी येथील मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठीचे हे मुख्य ठिकाण आहे. या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ आणि आजूबाजूला झाडी असल्याने आत काय चालले आहे हे बाहेरून दिसत नसल्याने या परिस्थितीचा गैरफायदा घेत हा अघोरी प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.
स्मशानभूमीच्या लोखंडी शवदाहिनीच्या जाळीवर बाहुलीला बिबा लाल दोऱ्याने बांधून ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर, शवदाहिनीच्या दोन्ही कोपऱ्यांत शेंडी काढलेले दोन नारळ, त्यापैकी एक फोडून ठेवलेला, एका लिंबावर व एका अंड्यावर महिलेचे नाव लाल रंगाने लिहून त्या महिलेला फोटो ठेवत अघोरी विधी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या अंधश्रद्धेतून केले जाणाऱ्या प्रकारामुळे सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक आहेत. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अशा प्रकारे नारळ, लिंबू , अंड, बाहुली , बिबा व महिलेचा फोटो वापर करून विधी केल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या समाजकंटकांचा प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे यासाठी ग्रामपंचायतीने परिसरात सिसिटिव्ही कँमेरे बसवण्याची गरज आहे .