Crime pudhari
कोल्हापूर

kolhapur Crime | आंबेवाडी धरणावरुन दीड लाख रुपयांच्या कृषी पंपांच्या केबल्स चोरीला

निम्म्या केबल्स जागेवरच जाळून तांबे धातू काढून घेतला; ZP सभापती विद्या पाटील यांनाही चोरांचा फटका

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : चंदगड तालुक्यात सर्वच भागात कृषी पंपांच्या केबल्स चोरांच्या टोळीचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच आंबेवाडी (ता. चंदगड) येथील धरणावरून येथे १७ शेतकऱ्यांच्या सुमारे १ लाख ४८ हजार रुपयांच्या केबल्स चोरून नेल्या. यापैकी सुमारे ७५ हजार रुपयांच्या केबल्स जागेवरच जाळून त्यातील तांब्याचा धातू काढून पलायन केले. याबाबतची फिर्याद कलिवडे येथील शेतकरी विजय लक्ष्मण गावडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. दोन इसमानी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. सोमवारी (दि. ११) पहाटे दीडच्या हा प्रकार घडला आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील ( ९,७०० रु. ), विजय गावडे, इरफान शेख, जानबा पाटील, अमृत पाटील, जोतिबा पाटील, शिवाजी कदम, रमेश कदम, निवृत्ती कदम, नामदेव पाटील ( या ९ शेतकऱ्यांच्या प्रत्येकी ९ हजार रुपये किमतीच्या केबल्स ), माजी सरपंच अशोक कदम ( १०,६०० हजार रु.), अशोक पाटील (१०,६०० रु.), सुहास तावडे (८,२०० रु.), संभाजी डुरे (८ हजार रु.) रुक्माना देसाई (७ हजार रु. ), सोमनाथ गावडे (६,१०० रु.), अर्जुन पटेल (७,६०० रु.) या १७ शेतकऱ्याना १ लाख ४८,८०० रुपयांचा फटका बसला. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. कोळेकर अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT