कोल्हापूर

पोर्लेतील खून अनैतिक संबंधातून; जवान गायकवाडसह चौघांवर गुन्हा

Arun Patil

पोर्ले तर्फ ठाणे, पुढारी वृत्तसेवा : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकरी विकास आनंदा पाटील (वय 40) यांचा खून अनैतिक संबंधातून झाला आहे. याप्रकरणी सैन्य दलातील जवान युवराज शिवाजी गायकवाड व अन्य तिघे अशा चौघांवर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मृत विकास पाटील यांची आई मालूताई यांनी फिर्याद दिली आहे.

युवराज गायकवाड व विकास पाटील यांची पत्नी यांचे अनैतिक संबंध होते. यातूनच सहा महिन्यांपूर्वी या दोघांत वाद झाला होता. यातूनच एकमेकांना मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात विकासचा मृतदेह ताब्यात घेत विकासचे नातेवाईक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. संशयिताला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली.

यावेळी शाहूवाडी-पन्हाळ्याचे पोलीस उपअधीक्षक पोवार यांनी संशयित आरोपीला अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, चौकशीसाठी संशयित आरोपीची पत्नी व मेहुणा यांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

SCROLL FOR NEXT