प्रेमीयुगुलाचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी रविवारी दिवसभरात अनेकांची चौकशी केली. मात्र, संशयित सापडलेला नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
शनिवारी शहरात काही ठिकाणी तरुणांच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ फिरत होता. ते दोघेही रील्स स्टार आहेत. इन्स्टाग्रामवर या प्रेमीयुगुलांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, तो रिल्स स्टार कसबा बावडा परिसरातील आहे का? याचीही चाचपणी पोलिसांनी केली. रविवारी शाहूपुरी पोलिसांनी काही तरुणांना बोलावून कसून चौकशी केली. एका संशयिताने माझा मोवाईल दीड वर्षांपूर्वी चोरीला गेला आहे. त्याचा डेटा रिकव्हर करून हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधितांचा तत्काळ शोध घ्यावा, असे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिले. रात्री पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे.