Kolhapur Zilla Parishad | शिवसेनेला बांधकाम, जनसुराज्यला शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद 
कोल्हापूर

Kolhapur Zilla Parishad | शिवसेनेला बांधकाम, जनसुराज्यला शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद

जि.प.मध्ये पदवाटप फॉर्म्युला निश्चित; एक वर्षासाठी राहणार पदे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी निवडीचे वेध लागले असून शुक्रवारी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीत इतर पदे कोणाला मिळणार, याचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेनेला बांधकाम व आरोग्य, तर जनसुराज्य शक्ती पक्षाला शिक्षण व अर्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळणार आहे.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला समाजकल्याण विभागाचे सभापतिपद मिळणार आहे. एक वर्षासाठी ही पदे दिली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आ. विनय कोरे, खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, प्रा. जयंत पाटील आदींसह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर उपाध्यक्षपद भाजपला मिळाल्यानंतर इतर पदे निश्चित करण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT