कोल्हापूर : महापालिका निवडणुकीनंतर तत्काळ कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल. पहिल्या टप्प्यात हद्दवाढीत शहर परिसरातील आठ गावांचा समावेश असेल, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
आ. क्षीरसागर म्हणाले, राज्यातील 125 नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या हद्दवाढीचे प्रस्ताव आहेत. महापालिका निवडणुकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराभोवती रिंगरोड करण्यासाठी तीन हजार कोटींची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.