कोल्हापूर सर्किट बेंच 
कोल्हापूर

Kolhapur News | कोल्हापूर सर्किट बेंचसाठी स्वतंत्र ४५९ पदे भरणार

पदनिर्मितीसह त्यावरील खर्चास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी नव्याने ४५९ पदे निर्माण करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पदनिर्मितीबरोबरच या पदांसाठी होणाऱ्या खर्चासही मान्यता दिल्याने लवकरच त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होण्याच्या दिशेने स्वतंत्र पदनिर्मिती झाल्याने हे आणखी एक पुढील पाऊल मानले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्‍या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेची १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिसूचना काढण्यात आली होती. यानंतर १८ ऑगस्ट २०२५ रोजी हे सर्किट बेंच सुरू झाले. यामुळे या सर्किट बेंचसाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही.

सर्किट बेंचच्या कामासाठी मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य शासनास सर्किट बेंचसाठी गट ‘अ’ ते गट ‘ड’ या संवर्गातील एकूण ४५९ पदांसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सर्किट बेंचसाठी लवकरच कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी मिळणार आहेत.

गट ‘अ’ संवर्गातील पदे

प्रबंधक-२, उपप्रबंधक-४, मा. मुख्य न्यायमूर्ती यांचे अतिरिक्त सचिव-१, सहायक प्रबंधक-९, सहायक प्रबंधक (आयटी)-१, उपमुख्य अनुवादक व दुभाषी-१, राजशिष्टाचार अधिकारी नि कोर्ट किपर-१, ग्रंथपाल-१ (एकूण २० पदे).

गट ‘ब’ संवर्गातील पदे

कक्ष अधिकारी-३२, सॉफ्टवेअर इंजिनिअर-१, हार्डवेअर इंजिनिअर-१, वरिष्ठ भाषांतरकार व दुभाषी-१ (एकूण ३५ पदे).

गट ‘क’ संवर्गातील पदे

उच्चश्रेणी लघुलेखक-३, निम्नश्रेणी लघुलेखक-८, सहायक कक्ष अधिकारी-८०, कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी-६, लिपिक-१७२, वाहनचालक-७ (एकूण २७६ पदे).

गट ‘ड’ संवर्गातील पदे

हवालदार-५, चोपदार-४, फायलर-६, पुस्तक बांधणीकर-१०, नाईक-४, झेरॉक्स ऑपरेटर-३, उ‌द्‌वाहनचालक-३, शिपाई/हमाल-७०, पहारेकरी-६, स्वयंपाकी-८, माळी-२, सफाईगार-७ (एकूण १२८ पदे).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT