चंदूर येथे दोन गटांत हाणामारी 
कोल्हापूर

Kolhapur Crime : चंदूर येथे दोन गटांत हाणामारी; दोन पोलिस जखमी

तीस जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथे उत्सवाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीवेळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक झाली. यामध्ये पवन दिलीप गुरव व प्रमोद चव्हाण हे दोघे पोलिस जखमी झाले, तर पोलिस वाहनाचेही नुकसान झाले.

या घटनेमुळे सिद्धार्थनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. शिवाजीनगर पोलिसांनी जि.प. सदस्य महेश पाटील यांच्यासह तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चंदूर येथे उत्सवाच्या अनुषंगाने युवकांचा जमाव दुचाकीवरून जल्लोष करीत निघाला होता. यावेळी दुसऱ्या गटातील युवकांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसन धक्काबुक्की, हाणामारीत झाले. याची माहिती समजताच शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने धाव घेतली. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका जमावाकडून दगडफेक सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT