अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल  File Photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : शहरातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसह एका तेरा वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी प्रकाश विजय मोरे (वय २५, रा. मेटाचा मार्ग, गडहिंग्लज) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास पीडिता मैत्रिणीकडे गणपतीचे डेकोरेशन करण्यासाठी गेली असता प्रकाश याने पीडिताच्या अंगाशी लगट केली. याशिवाय तिचा पाठलागही केला. याबाबत पीडितेने घरच्यांना सांगितल्यावर त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडितेबरोबर असलेल्या दुसर्‍या तेरा वर्षीय मुलीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही प्रकाश याने मेसेज केल्याने त्याबाबतही फिर्यादित तक्रार नमूद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT