कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक निकालानंतर कनाननगर परिसरात दगडफेक झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.याठिकाणी प्रभाग क्रमांक चारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरच ही घटना घडल्याचे समजत आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे दिसून येते.
प्रभाग क्रमांक चार मधील दिलीप पवार आणि मयूर पवार गटात तुफान दगडफेक झाली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दोन्ही समर्थकांमध्ये झाली दगडफेक सुरु झाली. यावेळी पोलिस समोर असूनही एकमेकांवर दगडफेक सुरु होती. पोलिसांनी बळाचा वापर करुन दोन्ही गटांना बाजूला पांगवले.