कोल्हापूर : फुलेवाडी येथे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या नूतन इमारतीचा आज रात्री स्लॅब कोसळला, या घटनेत काहीजण स्लॅबखाली साडल्याची भिती व्यक्त होत आहे. तर काहीजणांना काहींना बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात हलविल्याची माहिती.
याबाबत अधिक माहिती अशी की फुलेवाडी इथं जूनी महानगरपालिकेची अग्निशमन दलाची इमारत आहे त्याठिकाणी नवीन इमारत बनवली जात होती याच नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला, एकूण ४ जणांना बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक हा स्लॅब कोसळला या स्लॅब खाली एकूण 7 जण सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळच अग्निशमन दलाचे इतर कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तात्काळच घटनास्थळी दाखल झाले. एकूण 7 जणांना या ठिकाणहून बाहेर काढण्यामध्ये यश आले असून यामध्ये 2 जण किरकोळ जखमी आहेत तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली.