कोल्हापूर : हिमालयातील खडतर रस्त्यांवर यशस्वी प्रवास करणारे कोल्हापुरातील रायडर व त्यांच्या दुचाकी.  
कोल्हापूर

kolhapur | हिमालयातील अवघड रस्त्यांवर कोल्हापूरच्या दुचाकींचा खडतर प्रवास

१३ दिवसांत १४ हजार कि.मी. प्रवास करणाऱ्या एम.एच. ०९ ने जिंकली मने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : हिमालयातील उंच शिखरांवरील अवघड रस्त्यांवर वेग आणि कौशल्य यांचा मेळ साधत १३ दिवसांत तब्बल १४ हजार कि.मी. प्रवास करणारी कामगिरी एम.एच.०९ ने यशस्वी करून लोकांची मने जिंकली. कोल्हापुरातील २२ रायडर लोकांनी ही मोहीम नुकतीच फत्ते केली.

अरुण बेळगावकर, महेश देव, राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चंदीगड, सिमला, सरहान, चितकूल, काल्पा, नाको, काझा, चंद्रताल आणि मनाली, मंडी, पराशर लेक ते चंदीगड असा १४०० किलो मीटरचा प्रवास १३ दिवसांत पूर्ण करण्यात आला. या दरम्यान, १५ हजार फुटाचा कुमजुंग पास पार करण्यात आला. चंद्रताल नंतर रोहतांगच्या पायथ्याशी येईपर्यंत ५० भर लहान- मोठे ओढे, धबधबे पार करण्यात आले. दरम्यान, जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्कीम (१४५६७ फूट), चिंचम सस्पेनशन ब्रीज (१४००० फूट) ला मोहीमवीरांनी भेट दिली. नेहमी बाईकवरून प्रवास करणाऱ्या रायडर्सना पाहायची सवय असणाऱ्यांना स्कूटरवरून पाहिल्यानंतर प्रत्येकाने त्यांचा फोटो व फोन नंबर आवर्जुन घेत त्यांचे कौतुक केले. मोहिमेत सई चाळके, दीपाली पोवार, आसावरी गुप्ता, भावना शिंदे, गीताराणी माळी या धाडसी महिला आणि राजेश चाळके, उत्तम पाटील, महेश पोवार, कुणाल सावंत, अर्जुन हुजरे, सुरेश पाटील, श्रीकांत माने, प्रथमेश गुप्ता, युवराज पाटील, सुरेश बागल, प्रमोद लिगाडे, भगवंत देसाई, गणपत वारके, उत्तम मुदगल यांनी भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT