व्यवहारात मध्यस्थीच्या रागातून दुचाकी पेटवली 
कोल्हापूर

Kolhapur Crime : व्यवहारात मध्यस्थीच्या रागातून दुचाकी पेटवली

टिंबर मार्केट येथील घटना; संशयितास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केल्याच्या रागातून परप्रांतीय मजुराने पेट्रोल ओतून इलेक्‍ट्रिक बाईक पेटविली. याप्रकरणी अजय ऊर्फ उपेंद्र लुगन यादव (वय ४०, रा. उत्तर प्रदेश) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. रविवारी (दि. १६) मध्यरात्रीच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरात ही घटना घडली.

फिर्यादी कृष्णा मुरली बिंद (२४, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा फिरून खेळणी विक्रीचा व्यवसाय करताे. ताे टिंबर मार्केट परिसरात राहण्यास आहे. फरशी कामगार अजय यादव व राजेश महतो यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. कृष्णा बिंद याने या व्यवहारामध्ये मध्यस्थी केली होती. यातून चिडून रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास अजय यादव बिंद यांच्या घराच्या दारात आला. मोठमोठ्याने दंगा करून बिंद याला शिवीगाळ करू लागला. याचवेळी त्याने बाटलीतून आणलेले पेट्रोल बिंद याच्या दुचाकीवर ओतून ती पेटवून देत घटनास्थळावरून पलायन केले. बिंद व त्याच्या भावाने पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. सोमवारी याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा संशयितास पोलिसांनी अटक केली.

बाटलीत पेट्रोल मिळाले कसे?

जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाटलीत पेट्रोल देणे बंद केले आहे. मग, अजय यादवने बाटलीतून पेट्रोल आणले कुठून, याचा शोध पोलिस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT