अनेक भाजीपाला विक्रेत्यांचा माल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला Pudhari
कोल्हापूर

Unseasonal Rain Kolhapur | बांबवड्याला सलग तीन दिवस वळवाचा तडाखा; आठवडी बाजारात पाणी शिरले, विक्रेत्यांचे नुकसान

पावसामुळे व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली

पुढारी वृत्तसेवा

Bambavde Bajar Peth Sellers Losses

बांबवडे : बांबवडे (ता. शाहुवाडी) परिसरात सलग तीन दिवस वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी भर आठवडी बाजाराच्या वेळी दुपारी सुमारे तीन वाजता अचानक कोसळलेल्या पावसामुळे व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. त्यामुळे आठवडी बाजार पूर्णतः विस्कळीत झाला.

सुमारे तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाजीपाला विक्रेत्यांचा माल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले. सलग पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित होत असून वारंवार लपंडाव सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात वीजेच्या या समस्येमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बांबवडे व परिसरात दररोज वळीव पावसाची हजेरी लागत आहे. या पावसामुळे उस पिकाला काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असली, तरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू आणि मका पिकांची काढणी विस्कळीत झाली असून नुकसानही होत आहे. सततच्या पावसामुळे शेतीची कामेही ठप्प झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT