कोल्हापूर : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अपघात, शस्त्रक्रिया, गरोदर महिलांची आपत्कालीन गरज किंवा गंभीर आजारांमध्ये वेळेवर मिळालेली रक्ताची एक पिशवी एखाद्यासाठी संजीवनी ठरू शकते. अशा या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यात कोल्हापूरकरांचा सहभाग वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या ई-रक्तकोशच्या एका अहवालानुसार, नोंदणीकृत रक्तदात्यांच्या यादीत राज्यात कोल्हापूर जिल्हा 9 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर पुण्याचा नंबर लागतो. प्लेटलेटस्ची वाढती मागणी लक्षात घेता आता प्लेटलेटस् दान करण्यासाठीदेखील विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
वय 18 ते 65 दरम्यान असलेली व्यक्ती
वजन 45 किलोपेक्षा जास्त
हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 पेक्षा जास्त असलेली व्यक्ती
कोणतीही मोठी शस्त्रक्रिया, संक्रमण किंवा संसर्ग नसलेली व्यक्ती
जगात तिसर्या क्रमांकाचे प्लेटलेटस् डोनर कोल्हापूरचे
कोल्हापूरचे विश्वजित काशीद यांनी आजवर 185 वेळा प्लेटलेटस् डोनेशन केले आहे. या कामगिरीमुळे त्यांचा प्लेटलेटस् डोनर म्हणून जगात तिसरा क्रमांक, तर अत्यंत दुर्मीळ असलेल्या एबी निगेटिव्ह रक्तगटात पहिला क्रमांक लागतो.