कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात 1 कोटी 13 लाख 36 हजार 572 रुपयांचे दान जमा झाले. मंदिरातील 12 दानपेट्यांत भाविकांनी देणगी स्वरुपात दिलेल्या देणगीमूल्याची मोजदाद गुरुवारी (दि. 30) पूर्ण झाली.
मंगळवार (दि. 28) पासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने गेले तीन दिवस ही मोजदाद सुरू होती. या मोजदादीत काही दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले असून, विशेषतः पेटी क्रमांक 7, 1 व 2 मध्ये सर्वाधिक देणगी आढळून आली.