Ambabai Temple |  
कोल्हापूर

Ambabai Temple : अंबाबाईचरणी २० लाखांचे सोने, ४४ लाखांची चांदी अर्पण

नवरात्रौत्सवात देवस्थानच्या खजिन्यात सव्वा कोटीची भर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रौत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या सोने-चांदीच्‍या दागिन्‍यांसह विविध देणग्यांमुळे देवस्थान समितीच्या उत्पन्नात एक कोटी ३० लाख ५६ हजारांची भर पडली आहे.

११ ते २० ऑक्टोबर या १० दिवसांत भाविकांनी २० लाख ३० हजार २२३ रुपयांचे सोने आणि ४४ लाख ३८ हजार ४६७ रुपयांची चांदी अर्पण केली. याशिवाय रोख देणगी, अगरबत्ती, लाडू, कॅलेंडर आणि साडी विक्रीतूनही देवस्थानला लाखांच्या घरात उत्पन्न मिळालेे. दानपेट्यांतील रकमेची मोजणी अद्याप बाकी असल्याने अंतिम उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दहा दिवसांत एक कोटी ३० लाखांचे उत्पन्न

सोने : २०,३०,२२३ रुपये

चांदी : ४४,३८,४६७ रुपये

देणगी : ३६,७५,५९४ रुपये

अगरबत्ती विक्री : ४,४३,२०० रुपये

लाडू विक्री : २०,६५,३३५ रुपये

कॅलेंडर विक्री : १,३२,७९५ रुपये

साडी विक्री : २,७०,५४० रुपये

एकूण नोंदवलेली रक्कम : १,३०,५६,१५४ रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT