आजऱ्यात निवृत्त प्राध्यापकाच्या घरातून चौदा लाखांचे दागिने लंपास 
कोल्हापूर

Kolhapur News : आजऱ्यात निवृत्त प्राध्यापकाच्या घरातून चौदा लाखांचे दागिने लंपास

दुचाकीही लांबवली; परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

आजरा : आजरा शहरात चोरट्यांनी निवृत्त प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे यांची घरातून १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे १५ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. याशिवाय आणखी दोन ठिकाणीही चोरट्यांनी घरे फोडली. यात चांदीचे दागिने व रोख २० हजार रुपये लंपास केले. याबाबत प्रकाश नवनाथ शिंदे (रा. शिवकॉलनी, गांधीनगर रोड) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

शनिवारी पहाटे चार ते सकाळी ११ पर्यंत शिवकॉलनी, गांधीनगर रोड व आजूबाजूच्या परिसरात या घटना घडल्या. बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदिचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. युवराज जानबा जाधव यांचे ९.५ ग्रॅम वजनाचे दागिने व 3 तोळे वजनाचे चांदीचे दागिने, तसेच संजय यशवंत भोये यांच्या मालकीची ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल लंपास केली. श्वानपथकाला पाचारण केले; मात्र याचा उपयोग झाला नाही. चोरटे मोटारसायकलने पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT