कोल्हापूर

कोल्हापूर : गारगोटी शहरात अतिक्रमणावर हातोडा

मोहन कारंडे

गारगोटी; रविराज पाटील : गारगोटी शहरातील प्रांत कार्यालय जागेसमोर टप-या, खोकी मारून अतिक्रमण केले होते. प्रशासनाने अतिक्रमणावर हातोडा फिरवीला. सकाळी ६ वा. मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाईला सुरुवात केली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्यात येत असताना खोकीधारकांनी अतिक्रमण काढण्यावरुन वादावादी केली.

आम्ही स्वतः साहित्य काढून घेतो नुकसान करू नका, असे खोकीधारकांनी प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना सांगितले. त्यानंतर काहीकाळ कारवाई थांबविण्यात आली. त्यानंतर खोकीधारकांनी स्वतःहून आपले साहित्य काढून नेले.
घटनास्थळी पोलीस कुमक, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका तैनात ठेवली होती. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी अडसूळ, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक शेळके, जीवन पाटील, शितल माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता दिपक मिरजकर, शाखा अभियंता संतोष पाटील, राहुल पाटील, अक्षय गडदे यांनी कारवाई केली. या कारवाईत महसूल विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल सहभागी झाले होते.

SCROLL FOR NEXT