शिरोली एमआयडीसी : कसबा बावडा शिये रस्त्यावर शनिवारी भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार तर एकजण किरकोळ जखमी झाला हा अपघात सांयकाळी पाचच्या सुमारास घडला. मयत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही अपघातानंतर कार रस्त्यावर असलेल्या विजेच्या खांबावर जावून धडकल्याने कार व विजेच्या खांबाचे नुकसान झाले .
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कसबा बावड्याहून शिये फाट्याकडे निघालेल्या कार ( क्र. एम एच ०४ बी जे ४१३३) ने रस्त्याच्या कडेने चालत चाललेल्या दोघांना जोराची धडक दिली . यातील अज्ञात वयोवृद्ध व्यक्तीच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर किरकोळ जखमी झालेल्यांचे नाव सुनील प्रभाकर मोरे वय ४१ रा. हनुमान नगर शिये असे आहे . या अपघातात कार चे नुकसान झाले आहे.
पण या अपघाताने दोन शासकीय खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे या रस्त्यावरील हा दुसरा बळी गेला आहे. विज व रस्ते विकास महामंडळ यांच्या वादात रस्त्यावर असलेल्या खांबामुळे हा आज दूसरा अपघात झाला या मध्ये निष्पाप जीव गेला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर या शासकीय खात्याच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले जातील अशी अपेक्षा होती मात्र या दोन खात्याच्या अडेलतट्टू भुमिकेचा आज दूसरा बळी गेला. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत शिरोली पोलिसात झाली नव्हती.