फुलेवाडी : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कॉलनी येथील दुचाकी अपघातात मोहम्मद फैजान शफिक अन्सारी (वय 17, रा. झारखंड सध्या बिडी कॉलनी) हा युवक जागीच ठार झाला.
मोहम्मद आपल्या घराच्या वास्तुशांतीसाठी आला होता. बुधवारी दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान तो दुचाकीवरून बोंद्रे नगरकडे निघाला होता. दुचाकी पुढे असणार्या ट्रकला ओव्हरटेक करून जाण्याच्या गडबडीत समोरून येणार्या रिकाम्या टेम्पोला त्याची जोरात धडक बसली. दुचाकी टेम्पोच्या पुढच्या भागात घुसल्यामुळे अन्सारी याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. टेम्पो चालकानेच त्वरित त्याला रिक्षातून फुलेवाडी फायर स्टेशन परिसरातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथून त्याला सीपीआर मध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. राजवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.