कोल्हापूर

आराम बसच्या धडकेत मिनीबस चालक जागीच ठार

Kolhapur accident News | सहलीसाठी गेलेले लोक मुंबई दर्शन करून पुन्हा कर्नाटकात परतत असताना हा अपघात झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : महामार्गाच्या कडेला थांबलेल्या मिनीबसला आराम बसने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन बसच्यामध्ये चिरडून मिनिबस चालक जागीच ठार झाला. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. लोकेश तिमय्या (वय २४, रा. बिलीकेरे, ता. होणसुर, जि. म्हैसूर, कर्नाटक) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

पुणे-बंगळूरू महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती अशी की, कर्नाटकातील काही लोक सहलीसाठी महाराष्ट्रात आले होते. मुंबई दर्शन करून ते परत आपल्या गावी निघाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही बस घुणकी गावच्या हद्दीत आली असता मिनिबस थांबवून चालक लोकेश तिमय्या लघुशंकेसाठी मिनीबसच्या मागील बाजूस गेला. याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आराम बसने थांबलेल्या मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मिनीबसच्या मागे उभा असलेला चालक लोकेश तिमय्या हा बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.

अपघात इतका भीषण होता की मिनीबसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांतील काही प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर आरामबस चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT