कोल्हापूर

Kolhapur accident news | झाडाला ट्रक आदळून घाटकरवाडीचा युवक ठार

सुमीत सकाळी साडेनऊ वाजता ट्रकमधून कोल्हापूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला

पुढारी वृत्तसेवा

आजरा: आजरा-आंबोली मार्गावरील आल्याच्याडी शेजारी असलेल्या हॉटेलजवळील झाडाला ट्रक आदळल्याने ट्रकचा तरूण क्लीनर जागीच ठार झाला. सुमीत भाऊ पाटील (वय: २१, रा. घाटकरवाडी, ता. आजरा) असे त्याचे नाव आहे. तर राज आनंदा कांबळे कराड (वय: २१) हा ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे. 

सुमीत सकाळी साडेनऊ वाजता ट्रकमधून कोल्हापूरकडे जात होता. तो ट्रकचा क्लीनर असल्याने डाव्या बाजूला बसला होता. आल्याचीवाडी जवळील हॉटेलजवळ एका झाडाला ट्रक अचानक आदळला. यावेळी झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने सुमीतचा जागीच मृत्यू झाला. तर ड्रायव्हर राज याचा गिअर बाँक्समध्ये पाय अडकून किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी गवसे, घाटकरवाडी, धनगरमोळा येथील नागरीकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांनी तातडीने दवाखान्यात कांबळे याला उपचारासाठी दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT