महामार्गावर नागाव फाटा अपघात झालेला ट्रेलर 
कोल्हापूर

Kolhapur Accident |हॅन्डब्रेक निसटल्याने नागाव फाटा येथे अवजड ट्रेलर ब्रिजमध्ये घुसला, दिवसभर वाहतूक विस्कळित!

ट्रेलरचे मोठे नुकसान, ATM मधुन पैसे काढण्यासाठी ड्रायव्हर उतरला हॅन्डब्रेक निसटून ट्रेलरचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

नागाव;- पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा समोरील ( ब्रिज) पुलामध्ये मालवाहू ट्रेलर घुसून झालेल्या अपघात सुदैवाने जिवीत हानी टळली मात्र ट्रेलरचे मोठे नुकसान झाले हा अपघात शुक्रवारी रात्री अकरा वाजण्यासुमारास घडला . या मुळे दिवस भर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून इलेक्ट्रिकल मोठ्या कॉईल घेऊन बेंगळूरच्या दिशेने हा ट्रेलर जात होता . शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चालक नागाव फाटा येथील हॉटेल हिंदोळा शेजारी असणाऱ्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ट्रेलर रस्त्याकडेला हँडब्रेक लावून खाली उतरला होता. त्याच वेळी ट्रेलरचा हँडब्रेक निसटला हा अवजड ट्रेलर उतारावरून दोनशे फूट पुढे सरकला आणि थेट पुलाच्या बांधकामात जाऊन घुसला. या भीषण धडकेत ट्रेलरचा ॲक्सेल बार तुटून गाडीचे प्रचंड नुकसान झाले.

ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी गाडीचा क्लिनर केबिनमध्ये झोपलेला होता. सुदैवाने, या अपघातात त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक काहीशी तुरळक होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर हा प्रकार रहदारीच्या वेळी घडला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती . सध्या महामार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुलांची आणि रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे नागाव फाटा परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. या अपघातामुळे रात्रीपासूनच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शिरोली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT