गारगोटी : नितवडे येथील धबधबे पाहण्यासाठी गेलेला युवक सेल्फी काढताना तोल जाऊन पडला. अद्याप तो सापडला नाही. सुरज मेने (रा. वेंगरूळ) असे त्याचे नाव आहे.
सुरज मेने व त्याचे मित्र मंगळवारी दुपारी धबधबे पाहण्यासाठी गेले होते. मंडपी कडा येथे दगडावर चढून सुरज हा सेल्फी काढत होता. यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. शेणगाव येथील योगेश कोळी यांनी देखील पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर येथून रेस्क्यू टिम दाखल झाली होती, मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवली. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.