कोल्हापूर

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्सच्या फरार संचालकास अटक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह सात राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या फरार संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. दीपक बाबूराव मोहिते (वय 35, रा. आरे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.

त्याला न्यायालयाने 29 मे पर्यंत पोलिस कोठडी बजावली आहे. अटक संशयितांची संख्या 17 झाली आहे. अन्य फरार संचालक, एजंटांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. गुंतवणूकादारांना गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह 25 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक मोहिते पसार झाला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली होती. मोहिते हा आरे येथे आल्याची माहिती समजताच पथकाने त्यास रविवारी पहाटे ताब्यात घेतले.

SCROLL FOR NEXT