कोल्हापूर

कोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे धावत्या ट्रकने घेतला पेट

backup backup

कागल, पुढारी वृत्तसेवा : एसीचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची कागल येथील राष्ट्रीय महामार्गाव घडली. ही घटना गुरुवारी (दि.९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर भीतीचे वातावरण होते. ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकचे केबिन जळून खाक झाले असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

याबाबत अधिकची माहिती अशी की, १८ टन सफरचंद घेऊन ट्रक मुंबईहून बेंगलोरकडे निघाला होता. दरम्यान हा ट्रक कागल येथील राष्ट्रीय महामार्गावर आला असता ट्रकच्या एसीला झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रकचे संपूर्ण केबिन जळून खाक झाले. ट्रक जळत असताना आगीचे लोट निर्माण झाल्यामुळे महामार्गावर येणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कागल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानाने आग आटोक्यात आणली.

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT