gram panchayat elections pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Gram Panchayat | कोल्हापूर जिल्ह्यातील 458 ग्रामपंचायतींसाठी 12 जूनला प्रभाग आरक्षण सोडत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आणि यंदा संपत असणा 458 ग्रामपंचायतींची प्रभाग आरक्षण सोडत 12 जून रोजी काढण्यात येणार आहे. 8 जुलै रोजी प्रभाग आरक्षण अंतिम होणार आहे. याबाबत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होईल, यानंतर सप्टेंबर-आक्टोबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 2025 मध्ये मुदत संपलेल्या 25 ग्रामपंचायतींचे प्रभाग आरक्षण यापूर्वी काढण्यात आले होते; मात्र आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या कारणास्तव याबाबत काढलेले आरक्षणाची अधिसूचना रद्द करत पुन्हा नव्याने आरक्षण काढण्याचा आदेश दिला आहे. ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे.

या प्रवर्गाचे आरक्षण

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि महिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT