कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या वर्षातील मुदत संपणाऱ्या 433 ग््राामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या दिवशी प्रभाग रचना पाहण्यासाठी इच्छुकांसह ग््राामस्थांनी गर्दी केली होती. या प्रभाग रचनेवर दि. 13 पर्यंत हरकती घेता येणार आहेत.
जिल्ह्यातील तब्बल 433 ग््राामपंचायतींच्या निवडणुकांचा येत्या काही महिन्यांत धुरळा उडणार आहे. त्याचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला. या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभाग रचना जाहीर होताच ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. इच्छुकांकडून आपला संभाव्य प्रभाग कसा आहे, कोणती गल्ली, कोणता भाग आहे, कोणता दुसरीकडे गेला, कोणता दुसरीकडून आला, अखेरचे घर कोणाचे, पहिले घर कोणाचे आदी लहान तपशिलासह माहिती घेतली जात होती.