प्रकाश आबिटकर File Photo
कोल्हापूर

Kolhapur News : ३१ आरोग्य उपकेंद्रांना मिळणार नवी इमारत

१८ कोटी ९१ लाखांचा निधी मंजूर; प्रत्येक उपकेंद्रासाठी मिळणार ६१ लाख रुपये

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी १८ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यस्तरावरील १५ व्या वित्त आयोगांतर्गत हा निधी उपलब्ध होणार असून, प्रत्येक उपकेंद्रासाठी ६१ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून या ३१ उपकेंद्रांच्या इमारतींसाठी निधी मंजूर झाला आहे.

नवीन इमारती उभारल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच अधिक सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT