कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेली गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी सुरळीत पार पडली. कोल्हापुरातील 40 उपकेंद्रावर 9 हजार 158 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 3 हजार 106 विद्यार्थी गैरहजर होते.
सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त होता. सकाळपासूनच सर्वच परीक्षा केंद्रांवर गर्दी पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून परीक्षा केंद्रात सोडले जात होते. रविवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत पेपर झाला. 12 हजार 264 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; परंतु प्रत्यक्षात 9 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपस्थितीची टक्केवारी 74.67 टक्के इतकी आहे.
शहरातील केआयटी, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विद्यापीठ हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शाहू, कॉमर्स, केएमसी, शहाजी, राजाराम, महावीर, विवेकानंद कॉलेज, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिग, न्यू मॉडेल यासह 40 उपकेंद्रांवर परीक्षा झाली.