कोल्हापूर : राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील 10 नगरपालिका, नगरपरिषदा व 3 नगरपंचायतींमध्ये आता निवडणुकीसाठी धुरळा उडणार आहे. यावेळची नगरपालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धत असून, एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असणार आहेत. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली, तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठी, तर दुसरे मत थेट अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी द्यावे लागेल.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ‘अ’ वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्ष निवडीसाठी 15 लाख, सदस्यपदासाठी 5 लाख, ‘ब’ वर्ग नगरपरिषद थेट अध्यक्ष निवडीसाठी 11 लाख 25 हजार व सदस्यपदासाठी 3 लाख 50 हजार आणि ‘क’ वर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासाठी 7 लाख 50 हजार व सदस्यासाठी 2 लाख 50 हजार, नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी 6 लाख व सदस्यांसाठी 2 लाख 25 हजार रुपये इतकी मर्यादा आहे.
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणार्या उमेदवारांना जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोेचपावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा दिली आहे. मात्र, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने हीींिीं:/// ारहरीशलशश्रशल.ळप हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल.
आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव.