कोल्हापूर ः केएमटीचा अर्थसंकल्प सभापती सत्यजित जाधव यांना सादर करताना उपायुक्त परितोष कंकाळ व संजय सरनाईक. शेजारी उमेश पोवार व इतर.  (छाया ः पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur kmt budget | हायटेक केएमटीचा संकल्प

प्रशासनाकडून 74 कोटींचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : केएमटीत आयटीएस (इंटेलिजंट ट्रॅफीक सिस्टीम) विकसित करून त्यामधून अँड्रॉईड बेस्ड ई-तिकिटींग डिव्हाईस, संगणकीकृत पास वितरण यंत्रणा, मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट विक्री, डिजिटल पेमेंट, जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करण्याचा संकल्प केएमटीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. त्यासाठी 8 कोटींची तरतूदही केली आहे. प्रशासनाकडून 74 कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 23) परिवहन समितीला सादर करण्यात आला.

केएमटीचा सन 2025 सुधारित व सन 2026-2027 चा जमा-खर्चाचा महसुली 11,45,000 शिलकीचा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक के. मंजुलक्ष्मी यांच्या वतीने उपायुक्त परितोष कंकाळ यांनी परिवहन समितीला मान्यतेसाठी सभापती सत्यजित जाधव यांच्याकडे सादर केला. यावेळी समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, अति. परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव, लेखापाल राजेंद्र सूर्यवंशी, संतोष लोखंडे उपस्थित होते.

40 ई-बसेससह 88 बसेसचे नियोजन

शहरातील प्रमुख पार्किंग ठिकाणापासून अंबाबाई मंदिरापर्यंत शटल बससेवा सुरू करणे, केएमटी ताफ्यातील 65 डिझेल इंधनाच्या व ई-बस प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 40 इलेक्ट्रिक बसेस पुढील आर्थिक वर्षामध्ये दाखल होऊन दैनंदिन एकूण 88 बसेस मार्गस्थ राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT