King Cobra in Chandgad  
कोल्हापूर

King Cobra in Chandgad | चंदगडमधील कोदाळीजवळ किंग कोब्राचे दर्शन! (पहा व्हिडीओ)

परिसरातील समृद्ध जैवविविधतेवर शिक्कामोर्तब, सुमारे 12 फूट लांबीचा नागराज

पुढारी वृत्तसेवा

चंदगडः तिलारी जवळून जाणाऱ्या चंदगड ते दोडामार्ग या आंतरजिल्हा रस्त्यावर कोदाळी (ता. चंदगड) येथे ग्रीन हिल हॉटेल जवळ गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ५ वाजता अचानकपणे रस्त्यावर किंग कोब्रा या सापाचे दर्शन झाले.

या परिसरात जगातील अतिविषारी लांब किंग कोब्रा या जातीच्या सर्पाचे आढळस्थान असल्याने हा परिसर जैवविविधतेने अधिकाधिक समृद्ध असल्याचे पुन्हा सिद्ध होत आहे. कोदाळी येथील तरुण संतोष गावडे हा या रस्त्यावरून जात होता. यादरम्यान रस्त्यावरील मोरीवरून हा किंग कोब्रा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात होता. त्या सापाची सुमारे 12 फूट इतकी लांबी होती. घटनास्थळी पर्यटकांनीही गर्दी केली होती.

याबाबत पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील म्हणाल्या, यापूर्वी अनेक वेळेला किंग कोब्रा या वैशिष्ट्यपूर्ण सापाचा आढळ स्पष्ट झाला आहे. जगातील सर्वात लांब अति विषारी साप म्हणून याची गणना होते. बारा ते अठरा फूट इतकी लांबी या सापाची असू शकते. अशा सापांचे दर्शन झाल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT