केशवराव भोसले नाट्यगृहाची अजित पवारांकडून पाहणी file photo
कोल्हापूर

Keshavrao Bhosle Theater | केशवराव भोसले नाट्यगृहाची अजित पवारांकडून पाहणी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी कोल्हापुरातील आगीत बेचिराख झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाची पाहणी केली होती. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्टला नाट्यगृहाला आग लागली होती. आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले आहे.

'केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू त्याच दिमाखात उभी करणार' 

कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच 'केशवराव भोसले नाट्यगृहाला' लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे. हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन, असे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नाट्यगृहाच्या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केशवराव भोसले नाट्यगृह वर्षभरात उभारणार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग दुदैर्वी घटना आहे. कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाशी सर्वांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे जसे होते तसेच हे नाट्यगृह वर्षभरात उभारू, अशी ग्वाही देत याकरिता युद्धपातळीवर प्रक्रिया राबविली जाईल. नाट्यगृहासाठी २५ कोटींचा आराखडा केला आहे. विम्याचे ५ कोटी मिळतील. उर्वरित २० कोटी राज्य शासन देईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणीनंतर शनिवारी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT