हसन मुश्रीफ  Pudhari FIle Photo
कोल्हापूर

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‌‘पी.एम. सूर्यघर‌’ योजनेसाठी अल्प व्याजदरामध्ये कर्जपुरवठा

अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ‌‘पी.एम. सूर्यघर‌’ योजनेंतर्गत घरगुती सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ग््रााहकांना सौरऊर्जा प्रकल्पांसाठी कर्जपुरवठा केला जाणार आहे. संबंधित ग््रााहक कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी असून, त्याच्या नावावर घर व वीजमीटर असणे आवश्यक आहे.

सध्या शासनाकडून एक किलोवॅटसाठी रु. 30 हजार, दोन किलोवॅटसाठी रु. 60 हजार आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी रु. 78 हजार इतके अनुदान दिले जाते. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 21,084 वीज ग््रााहकांनीच या योजनेचा लाभ घेतला असून, भांडवलाच्या अभावामुळे ग््राामीण भागातील ग््रााहकांना या योजनेपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे ही योजना बँकेने सुरू केली आहे.

एक किलोवॅटसाठी सहा टक्के व्याजदराने रु. 65 हजार कर्ज दिले जाणार असून, शासन अनुदानानंतर उर्वरित रु. 35 हजार कर्जासाठी 50 महिन्यांची मुदत आणि सुमारे रु. 793 मासिक हप्ता राहील. दोन किलोवॅटसाठी सात टक्के व्याजदराने सुमारे सव्वा लाख कर्ज, अनुदानानंतर रु. 65 हजार कर्जासाठी 36 महिन्यांची मुदत व सुमारे रु. 2,007 मासिक हप्ता राहणार आहे.

या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, दिलीप लोखंडे, गजानन पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT