कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे. समवेत पदाधिकारी.   (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Kaustubh Gawade | पैशाअभावी गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न थांबू देणार नाही : कौस्तुभ गावडे

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इंजिनिअरिंग, डिप्लोमा, वैद्यकीय आणि कृषी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या गरीब, शेतकरी व कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सांगितले.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांमधील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही अनेक विद्यार्थी जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र, शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहणे, मंजुरीस विलंब होणे आणि मंजूर रक्कम वेळेत खात्यात जमा न होणे, यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी अनेकांना उसनवारी किंवा कर्जाचा आधार घ्यावा लागतो. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

परिस्थिती बदलण्यासाठी शिष्यवृत्ती अर्जांची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणे, अर्ज मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा ठरविणे आणि मंजूर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे गावडे यांनी नमूद केले. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागांशी संपर्क साधून पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि गुणवत्तेला योग्य संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT