कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. 
कोल्हापूर

Kaustubh Gawade News | शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग

Pune Teachers Constituency Election 2026: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग

पुढारी वृत्तसेवा

Kaustubh Gawade News

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार तथा शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला वेग आला असून विविध जिल्ह्यांतील भेटीगाठींची जोड मिळत आहे. शिक्षक, शिक्षण संस्था, कर्मचारी संघटना तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधत गावडे यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होत आहे.

प्रचार दौऱ्यादरम्यान कौस्तुभगावडे यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा विविध मान्यवरांच्या भेटीगाठी; सकारात्मक प्रतिसाद परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, सातारा आयटीआय संघटनेचे अध्यक्ष नेताजी बेचले, सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, शिल्पनिदेशक चिंतामणी काटवते, आर. वाय. जाधव तसेच पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे मार्गदर्शक गुलाबसिंग कदम यांची सदिच्छा भेट घेतली. भेटींमध्ये शिक्षक मतदारसंघातील विविध प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली.

विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या या भेटीगाठींमुळे शिक्षक मतदारसंघातील स्थानिक समीकरणे, शिक्षकांच्या अपेक्षा आणि संघटनात्मक संपर्क यांना प्रचारात महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादसभा आणि विविध संघटनांशी चर्चा यांच्या माध्यमातून प्रचाराचा विस्तार करण्याची भूमिका कौस्तुभ गावडे यांच्या प्रचार यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार

शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्याची भूमिका कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केली. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT