कोल्हापूर : भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीस पाठिंब्याचे पत्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे देताना राजकीय पक्ष, सामाजिक संघटना पदाधिकारी. शेजारी डॉ. स्मिता जाधव व इतर.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Kaustubh Gawade| कौस्तुभ गावडे यांना राजकीय पक्ष, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्थांचा वाढता पाठिंबा

जनता दल (सेक्युलर), दलित पँथरसह विविध संस्थांकडून उमेदवारीस समर्थन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, दलित पँथरसह कारेश्वर शैक्षणिक संस्था, ब्रिलियंट स्कूल नरंदे, खोची हायस्कूल, कै. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल आणि जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, भादोले यांनी त्यांच्या उमेदवारीला समर्थन दिले.

जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्राचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, दलित पँथरचे यशवंतभाऊ नडगम, जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील व सचिव पी. टी. पाटील यांनी गावडे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूलचे अध्यक्ष जयवंत लक्ष्मणराव चौगुले, खोची हायस्कूलचे अध्यक्ष बी. के. चव्हाण, ब्रिलियंट स्कूलचे अध्यक्ष नितीन पाटील व कारेश्वर शैक्षणिक संस्थेचे ॲड. संग्रामसिंह शेवाळे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न, तसेच शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. विविध संस्थांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या प्रचाराला बळ मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT