कोल्हापूर

Kallammavadi project: ‘काळम्मावाडी‌’25 टक्केच दुरुस्त

निधी उपलब्ध असूनही वर्षापासून धरण दुरुस्तीचे काम रखडलेलेच

पुढारी वृत्तसेवा
सुनील सकटे

कोल्हापुर : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चाच होणाऱ्या काळम्मावाडी धरण दुरुस्तीस अखेर निधी उपलब्ध झाला. मात्र, निधी उपलब्ध होऊनही वर्षभरात केवळ 25 टक्केच काम झाल्याने नागरिकांतून तीव नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदार आणि यंत्रणेचे अपयश असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि सरकारी यंत्रणेत तज्ज्ञांचा भरणा असताना गळती रोखण्यासाठी ठोस काम करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षी राज्य शासनाने धरण दुरुस्तीसाठी 80 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली, तर 62 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून 13 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. मात्र, धरणातील पाणी दुरुस्तीसाठी अडथळा येत असल्याचा जलसंपदाचा दावा आहे. वर्षभरात केवळ 13 कोटी रुपयांचे काम झाल्याचे सांगण्यात येते; पण गेले अनेक महिने काम ठप्प झाले आहे. पावसाळ्यात काम बंद राहिले मात्र, त्यानंतरही कामास आवश्यक गती मिळाली नसल्याचे चित्र आहे.

एकूण ग््रााऊंटिंग कामापैकी केवळ 28 टक्के ग््रााऊंटिंग पूर्ण झाले आहे. मोनोलिथ एक ते चार आणि 8 व 9 मधील धरण माथा पातळी ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटर वर ग््रााऊंटिंगचे काम पूर्ण झाले आहे. जास्त खोलीचे आणि मोनोलिथ क्रमांक 5 व 7 मधील धरण माथा पातळी ते इन्स्पेक्शन गॅलरीच्या एक मीटरवर ग््रााऊंटिंगचे काम झाले नाही. एवढेच नाही इन्स्पेक्शन गॅलरी ते फाऊंडेशन गॅलरीपर्यंतचे ग््रााऊंटिंगचे कामही अपूर्ण आहे. मोनोलिथ एक ते चार आणि 8 व 9 मधील धरणाच्या उर्ध्वबाजूचे जुने ग््रााऊंटिंग तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मोनोलिथ क्रमांक 5 व 7 मधील ग््रााऊंटिंगचे काम सुरू आहे.

असे असले, तरी धरण दुरुस्तीच्या कामाचा वेग आणि वर्षभरात झालेल्या कामाचा अंदाज घेता दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला कमी पडतो की काय, अशी विचारणा या निमित्ताने केली जात आहे. समुद्रात पूल बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना एका धरणाच्या ग््रााऊंटिंगला इतका विलंब कसा? असा सवाल निर्माण केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT