कळंब्यातील थ्रीस्टार लॉजवरील गर्भलिंग निदानप्रकरणी लॉज मालकाला अटक 
कोल्हापूर

Kolhapur News : कळंब्यातील थ्रीस्टार लॉजवरील गर्भलिंग निदानप्रकरणी लॉज मालकाला अटक

करवीर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कळंबा येथील थ्रीस्टार लॉजिंगवरील गर्भलिंग निदानप्रकरणी करवीर पोलिसांनी मंगळवारी लॉज मालक प्रदीप प्रकाश संकपाळ (वय ३६, रा. कळंबा, ता. करवीर) याला अटक केली.

मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील याच्या बालिंगा येथील घरी छापा टाकला. अटक केलेल्या दोन एजंट महिलांनी ७० हून अधिक महिलांची गर्भलिंग तपासणी केल्याची माहिती पोलिसांना दिली. कळंबा येेथे गर्भलिंग निदान केंद्रावर करवीर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला. मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील, एजंट किरण चव्हाण, संतोष कोळी, लॉज मालक, चालक पसार झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT