Kagal Nagarparishad Anti-Encroachment Campaign Pudhari
कोल्हापूर

Kagal News | कागलमध्ये बेकायदेशीर टपऱ्या-खोक्यांवर कारवाई; नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम

या मोहिमेअंतर्गत बस स्थानक ते निपाणी वेस तसेच बस स्थानक ते ठाकरे चौक या मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Kagal Nagarparishad Anti-Encroachment Campaign

कागल : कागल नगरपालिकेच्या वतीने शहरातील बेकायदेशीर टपऱ्या, खोकी, फलक आणि छपऱ्यांविरोधात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत बस स्थानक ते निपाणी वेस तसेच बस स्थानक ते ठाकरे चौक या मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

दुपारी सुमारे बारा वाजल्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नगरपालिका कार्यालयापासून खर्डेकर चौकापर्यंतच्या रस्त्यावर एका बाजूला असलेल्या टपऱ्या, खोकी तसेच डिजिटल फलक हटविण्यात आले.

खर्डेकर चौक परिसरात सात ते आठ खोकी उभारण्यात आली होती. या खोक्यांबाबत गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध चर्चा सुरू होत्या. नगरपालिकेने या खोकींवरही कारवाई करत ती हटवून टाकली.

अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ही मोहीम दिवसभर सुरू राहणार असून शहरातील फूटपाथ पूर्णपणे मोकळे करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT