कागल : पंचतारांकित एमआयडीसी गॅस गळतीमुळे उठलेले आगीचे लोट. 
कोल्हापूर

Burning Gas Incident | कागल एमआयडीसीत ‘बर्निंग गॅस’चा थरार

पुढारी वृत्तसेवा

कसबा सांगाव : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सोक्टास इंडस्ट्रीजजवळ एच.पी. गॅसच्या वितरण पाईपलाईनला गळती लागल्याने आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. बर्निंग गॅसचा थरार भर दुपारी घडल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले.

पाईप लाईनमधून गॅस गळती होत असताना अचानक पेट घेतल्यामुळे आगीच्या प्रचंड ज्वाळा हवेत उसळत होत्या. दुर्घटनेच्या ठिकाणी कामगारांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिक आणि कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तसेच गॅस पुरवठ्याचा मुख्य व्हॉल्व बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाच्या सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT