Kabnur election dispute attack | निवडणूक वादातून खुनी हल्ला; कबनुरातील तिघांना अटक Pudhari Photo
कोल्हापूर

Kabnur election dispute attack | निवडणूक वादातून खुनी हल्ला; कबनुरातील तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : कबनूर येथे निवडणूक वादातून दोघांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी प्रणव सुनील कदम, धीरज सुनील पाटील, नजीर जमीर शेख (तिघे रा.कबनूर) या तिघांना अटक करण्यात आली. प्रेम रणजित कांबळे व शाहरूख अत्तार ऊर्फ शेख (दोघे रा. कबनूर) या संशयितांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याची माहिती पो.नि. शिवाजी गायकवाड यांनी दिली.

कबनूर येथे मतदानाच्या अनुषंगाने पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून सागर आनंदा सोडगे (रा.कबनूर) यांना संशयितांनी फरशीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाले होते. सोडगे यांना कबनुरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता तिथे त्यांचा मित्र ओंकार कोकाटे याच्यावरही लोखंडी रॉड व चाकूने वार करून खुनी हल्ला करण्यात आला. त्यात दोघेही जखमी झाले होते.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सोडगे यांच्या फिर्यादीनुसार प्रेम कांबळे, प्रणव कदम, शाहरूख अत्तार, धीरज पाटील, नजीर शेख आदींसह अन्य अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. पाच जणांपैकी अटक केलेल्या कदम, पाटील व शेख या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता 12 फेब—ुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सपोनि शरद वायदंडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT