जोतिबाचा प्रकट दिन सोहळा उत्साहात 
कोल्हापूर

Jyotiba temple : जोतिबाचा प्रकट दिन सोहळा उत्साहात

‌‘चांगभलं‌’चा गजर; हजारो भाविकांची डोंगरावर उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पहाटेपासून मंदिरात भाविक, ग््राामस्थांसह पुजाऱ्यांनी दंडस्नान घेतले.

सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी श्री जोतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी उंट, घोटे, लवाजम्यासह आरती सोहळा निघाला. आतषबाजी करत गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यात आली. सकाळी 7 ते 9 लघुरुद्र अभिषेक व केदारनाथ अष्टभैरव म्हणण्यात आले. सकाळी 9 ते 12 विश्वशांती यज्ञ झाला. श्रींच्या पुजाऱ्यांच्या हस्ते पूर्णाहुती देण्यात आली. दिवसभरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी याचा लाभ घेतला. दिवसभरात हजारो भाविकांनी कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT