Jyotiba temple | ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा पहिला खेटा 
कोल्हापूर

Jyotiba temple | ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबाचा पहिला खेटा

हजारो भाविकांनी केली गुलाल-खोबर्‍याची उधळण

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात दख्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यांना उत्साहात सुरुवात झाली. रविवारी पहिला खेटा होता. खोबरे, गुलालाच्या उधळणीत आणि चांगभलच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर आणि जोतिबा डोंगर परिसर दुमदुमून गेला.

मध्यरात्रीपासूनच भाविक डोंगरावर दाखल होत होते. हळूहळू वाढत चाललेली पहाटे अलोट झाली. पहाटे चार वाजता मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर जोतिबाची पाद्यपूजा व काकड आरती सोहळा झाला. सकाळी आठ वाजता जोतिबासह सर्व देवदेवतांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जोतिबाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. साडेअकरा वाजता उंट घोडे, मानकर्‍यांसहीत ‘श्रीं’चा धुपारती सोहळा संपन्न झाला.

दिवसभरात असंख्य भाविकांची कुलदैवत दख्खनचा राजाच्या दर्शनासाठी रिघ लागली होती. पहाटेपासूनच डोंगरावर गर्दी असल्याने पार्किंगची जागा वाहनांनी फुल्ल भरून गेली होती. सायंकाळी उंट, घोडा अशा लवाजम्यासहीत आणि गुलाल-खोबर्‍याची उधळण करत ‘श्रीं’चा पालखी सोहळा झाला. कोडोली पोलिस ठाणे व देवस्थान समितीकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT