Modular operation theater 
कोल्हापूर

Modular operation theater : जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात देशातील पहिले ‌‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर‌’

राष्ट्रीय मानांकनासाठीही या केंद्राची निवड

पुढारी वृत्तसेवा

संतोष बामणे

जयसिंगपूर : जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात नव्हे, तर देशातील पहिले अत्याधुनिक ‌‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर‌’ उभारले आहे. या आरोग्य केंद्राने राज्यस्तरीय मानांकन प्राप्त केली आहेत. शिवाय, आता राष्ट्रीय मानांकनासाठीही या केंद्राची निवड करण्यात आली आहे. डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या प्रयत्नातून हे केंद्र राज्यात नव्हे, तर देशात अव्वल ठरत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाचा नावलौकिक वाढला आहे.

स्वच्छ सर्वांग सुंदर दवाखाना या उपक्रमात सलग 5 वर्षे जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. कायाकल्प योजनेत सलग 3 वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता याची राष्ट्रीय मानांकनासाठी निवड झाली आहे. डॉ. खटावकर यांनी रोटरीचे पदाधिकारी बी. टी. नाईक, इंजिनिअर विनेश खाडे, आशुतोष पाटील, रोहित कुसनाळे यांच्याकडे या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरची संकल्पना मांडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT