कोल्हापूर

जयसिंगपूर : तमदलगेच्या वळणावर अपघात! भरधाव चारचाकीच्या चालकाचा ताबा सुटल्याने वाहन घुसले थेट घरात

backup backup

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर सांगली महामार्गावर कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे येत असलेले भरधाव चारचाकी वाहन तमदलगे (ता.शिरोळ) येथे वळणावर दुचाकी वाहनाला धडकले. या चारचाकी वाहनाचा वेग प्रचंड असल्याने ताबा सुटून राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे व राहत्या घराच्या पत्र्याचे शेडचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येत होते. मात्र तमदलगे बस थांब्याजवळ महामार्गाला वळण असल्याने भरधाव वाहन दुचाकीला धडकले. मात्र चारचाकी वाहनाचा वेग प्रचंड असल्याने महामार्गालगत असलेल्या हेळवी यांच्या राहत्या घराच्या शेडमध्ये घुसली. यात शेड व घरातील संसारयुक्त वस्तूचे मोठे नुकसान झाले.

त्याचबरोबर चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. यात दुचाकी चालक जखमी झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे तमदलगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती.

SCROLL FOR NEXT