Gang War Jainyal Case | जैन्याळ येथे गँगवार प्रकरण; नऊ जणांना पोलिस कोठडी  Pudhari
कोल्हापूर

Gang War Jainyal Case | जैन्याळ येथे गँगवार प्रकरण; नऊ जणांना पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : कागल तालुक्यातील जैन्याळ गावात तरुणांच्या गँगने कुऱ्हाड, तलवार व इतर हत्यारे दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व अटकेत असलेल्या नऊ जणांना (दि. २२) जूनपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

जैन्याळ येथे आर्या गँगच्या दहा जणांनी नंग्या तलवारी व कुऱ्हाडी नाचवत माजवलेल्या दहशतप्रकरणी मुरगूड पोलिसांत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्या नऊ जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

पोलिस कोठडी मिळालेल्यांमध्ये गँगचा म्होरक्या अमोल ऊर्फ आर्या मोहिते, अवधूत लुगडे (रा. अर्जुनवाडा, ता. कागल), आकाश शिवाजी कांबळे (सेनापती कापशी), यश दिलीप कांबळे (रा. कुरुकली, ता. कागल), अवधूत रामचंद्र आरागडे (वय २५, रा . अर्जुनवाडा), हर्षद रमेश मुसळे (२०, रा. आलाबाद), मनोज विठ्ठल सातवेकर (४२ रा. अर्जुनवाडा), ऋषीकेश गंगाधर कांबळे (२६, रा. कापशी ), वैभव प्रकाश लुगडे (२६, रा. अर्जुनवाडा) व राजवर्धन रवींद्र कांबळे (१९, रा. आणूर ) यांचा समावेश आहे. दहावा आरोपी अवधूत लुगडे (रा. अर्जुनवाडा) हा फरार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT